माझी सखी...

माझी सखी...
अस वाटल असेन ना माझी सखी म्हणजे हिची खास मैत्रीण... अहाहा अजिबात नाही.. 
मलाही हा प्रश्न पडलेला माझी सखी नेमकी कोण???
सुख ही दोन प्रकारचे असतात एक जे आपण बाहेर शोधत असतो अन् दुसर जे आपल्या आजूबाजूला असूनही आपल्याला सापडत नसत. पण ते बोलतात ना माणूस हा अनुभवातून शिकतो तसच काहीस माझ्यासोबत ही झाल. मी माझ्या मैत्रीच सुख हे बाहेर शोधत होते. आजतागत माझ्या आयुष्यात बऱ्याच मैत्रिणी आल्या सर्वांनी भरभररून प्रेम केल, जीव लावला.वाईट वेळी साथ ही दिली पण प्रत्येक वस्तूची कालबाह्यता तारीख असते तशीच माझ्या मैत्रीलाही कालबाह्यता तारीख येत राहिली. पण ह्या माझ्या सखी नाही होऊ शकल्या. माझ्या आयुष्यातील त्या व्यक्तीलाही कधीच कालबाह्यता तारीख नव्हती परंतु ती व्यक्ती मला सापडत नव्हती.
असो.. 
लहानपणापासून ती कालबाह्यता तारीख नसलेली व्यक्ती माझ्याकडे होती अन् ती व्यक्ती मला आता सापडली.. ती व्यक्ती मला आता कळू लागली.. ती म्हणजे माझी आई.. मी कधी आईशी मैत्रीचा प्रयत्न देखील केला नाही, कारण आई मुलीच्या नात्यात कितपत मैत्री असते? हे मला माहीत नव्हत. बाहेर बरच काही ऐकून होते आई ही मुलीची मैत्रीण असते अस तस... पण माझी आई माझी मैत्रीण होईल का? ती मला समजून घेईल का? अशी अनेक प्रश्न मनात चक्रीवादळ प्रमाणे फिरत होते.. 
एक दिवस असा आला की, मन अगदी घट्ट केल, शांत केल मनाला, की आपण प्रयत्न तरी करू आईशी मैत्री करायचं होईल ते बघून घेऊ नंतर.. शेवटी तो दिवस आलाच मी माझ्या मनात खूप काही साठून ठेवलेल,मला माझ मन मोकळ करायचचं होत.मी घाबरलेली,आई कामात व्यस्त होती मी कॉलेज मधून घरी आलेले. कॉलेज मध्ये जे काही झाल ते वेळ पाहून आईला संगितल. आईने ते सर्व शांतपणे ऐकून घेतल त्यावर काही प्रतिक्रिया नाही दिली मी आणखी घाबरले, आईला कॉलेज मधला किस्सा संगितला 
 खरं, पण आईला काय वाटल असणार असे  १०० प्रश्न मनात नाच करत होते... परंतु आईने तो किस्सा अगदी नीट समजून घेतला न त्या वेळी मला करायला हव ते तिने अगदी छान समजावून संगितल.. अन् शेवटी माझा जीव भांड्यात पडला...म अस् जाणवल आईने हे समजून घेतल तर आपण आईशी अजून बोलून बघू हळूहळू रोज आईला माझ्या जीवनात इथवर जे झाल ते मी आईला सांगू लागली, त्यावर तीच काय म्हणण आहे ते ऐकण,अश्या रीतीने तिही तिचा अनुभव सांगू लागली व तिचा तो अनुभव समजून घेणे त्यातून काहीतरी शिकणे, तिचे सल्ले वैगरे घेणे व ते आपल्या दैनंदिन जीवनात उतरवंन.. हे सर्व काही खूप छान वाटू लागलेल.
अन् माझा हा आता दिनक्रम च झालय जणू. आता अस झालय की माझ अन् तीच नात लहानतलीलहान गोष्ट ही आधी तिला येऊन सांगण, तिच्यासोबतची मस्ती, तिच्यासोबतच्या गप्पा... वाह हे सगळ खूपच भारी म्हणजे भारीच... 
लहानपणापासून बाहेरच्या जगात शोधणारी मैत्रीण/सखी जिला कालबाह्यता तारीख नाहीये.अशी माझी सगळ्यात आवडती माझी मैत्रीण “माझी आई” “माझी सखी”🥀🌍❤️
-रविना थोरवे.

Comments

Popular posts from this blog

खेळांच्या शोधात...

आजी ते माजी प्रवास😊