खेळांच्या शोधात...

खेळांच्या शोधात...
ते खेळ तरी काय खेळ असायचे....
विटीदांडू,गोट्या,लगोरी, लपाछपी,सोनसाखळी,चारचिठ्ठी,पकडापकडी,डोंगर का पाणी,मामाच पत्र ,भोवरा, कांदाफोडी,कब्बडी,खो-खो... काय हे खेळ ह्या खेळांची ना मज्जाच काहीसी वेगळी,अशी अनेक खेळ जी आपण लहानपणी खेळायचो अर्थात आताही खेळतो पण कधीतरी अन् तो कधीतरी कधी उगवेन हे माहित नाही... असो पण हे सारे खेळ आपण जस जस मोठे होत गेलो तस तस हे सर्व खेळ आपण बालपणाला देऊन पुढे निघून आलो...
काय मं खेळांची नाव वाचून बालपणात गेलात का ??? 
जशी वार्षिक परीक्षा संपली कि मुलांच्या अंगात ह्या सर्व खेळाचं भूत संचारायच, ती मे महिन्याची सुट्टी अन् हे सारे खेळ जणू एक घट्ट मैत्रीच करून बसायचे...👬🏻👭🏻 हरवलात पुन्हा जुन्या आठवणीत...😁😁
असो पण हे सर्व खेळ फक्त खेळ नव्हत तर आपल्या मुलांची शारीरिक, बौद्धिक, मानसिक क्षमता वाढवण्यासाठी मदत करणारी खेळ होते. माझ्या मते तरी हे खेळ मुलांना हार पत्कारायला शिकवायचे. ह्या मैदानी खेळामुळे मुलांना व्यायामची साथ मिळायची कारण त्या काळात जीम असा प्रकार नव्हता त्या काळात फक्त अन् फक्त खेळ...परंतू आता मात्र ह्यातले बरेचसे खेळ हे फक्त शिक्षणापूर्ती मर्यादित राहिले आहेत जसे कब्बडी, खो-खो...😕😕
मीदेखील हे आणि ह्यांसारखे बरेच खेळ खेळली आहे. त्त्यातल्या त्यात एक किस्सा तुमच्यासाठी....
जेव्हा आम्ही सर्व भाव-भावंड लपाछपी खेळायचो तेव्हा ज्या कुणावर राज्य तो आपल ते १०,२०,३०, अन् मधले सगळे अंक खाऊन direct १००😂😂😂पण हि अशी cheating ह्या खेळत प्रत्येक जण करत असतो मीपण केली आहे😉😉🤣🤣 असो जेव्हा आम्ही सर्व भाव-भावंड लपायचो तेव्हा दोन-तीन जण एकत्र लपायचो.न तेव्हा जर आम्ही घरात लपलो तर आम्ही आमच्या आईच्या किंवा काकी च्या मामीच्या साड्या घालायचो अन् मुल बाबाचे किवा मामाचे काकांचे शर्ट-पॅट घालयचे जेणेकरून व्हायचं अस कि ज्याच्यावर राज्य आहे तो बिचारा गोत्यात यायचं कि नेमक समोर कोण लपलय कुणाच नाव घेऊ अन् कुणाला शोधू......खरच पण काय खेळ होते ते. माझा हयांपेकी सगळ्यात आवडता खेळ म्हणजे लगोरी काय तो बॉल जोरात लागतो पाठीला पण ते सात थर लाऊन झाल्यावर जो लगोरी लगोरी बोल्याचा आनंद काही औरच...हो ना??? आठवते का कुणाला लगोरी ????
आताच्या पिढीला नाही कळणार ती मज्जा त्या लागोरीमधली त्या भोवऱ्यामधली त्या कांदा फोडी मधली...
आताच्या पिढीला हि नाव तरी माहित आहेत का ????? 
आताची पिढी मैदानी खेळ सोडून दूरध्वनीच्या खेळात व्यस्त झाली मग हळूहळू आले ते संगणक ज्यांनी मुलांच्या अवतीभोवती फेर घालायला सुरवात केली..... आता तर विचारायलाच नको आताच्या मुलाचं सर्वात आवडता खेळ त्यांच्या हातात आपणच दिला आहे तो म्हणजे “THE MOBILE” ज्यात कॅडी क्रश,सबवेसफर, रेसिंगकार, टॉकिंगटॉम, मॉडर्नस्ट्राईक ऑनलाईन, टेम्पलरन असे बरेच खेळ ज्यांची यादी करायाला गेली तरी कमी पडेल. ह्यापैकी एक खेळ ज्याच्या आहारी मी देखील आलेली तो म्हणजे सबवेसफर खूप वेड्यासारखी खेळायची पण काही वेळानंतर स्वत:ची चूक स्वत:लाच जाणवली ती हि ह्या लॉकडाऊन मुळे....लॉकडाऊन मध्ये गावी गेल्यावर पुन्हा मी माझ्या लहानपणात रमले लगोरी,पकडापकडी ह्या सर्व खेळांचा पुन्हा अनुभव घेताला अन् तेव्हा जाणीव झाली कि आपण ह्या टेक्नॉलॉजी च्या नावाखाली असलेल्या मोबेईल ह्या खेळातून बाहेर पडलो कि आपल्यला आपल लहानपण पुन्हा जगता येत...आपल्यला आपल्या मातीची माया मिळते...आणि ती मातीची माया मिळवण्यासाठी आधी तो मोबाईल बाजूला सरावा...तरच आपण आपल लहानपण पुन्हा जगू...😊😊❤️
एक टीप: सर्व आई वडिलांना आणि घरातल्या मोठ्यांना... आपल्या मुलांना आपल्या मातीच्या खेळांची जाणिव करुन देत चला... त्यांच्याकडून त्यांच लहानपण हिरावून जाईल इतपत तो मोबाईल नावाचा खेळ त्यांच्या हातात देऊ नका.
- रविना थोरवे 

Comments

Popular posts from this blog

आजी ते माजी प्रवास😊

माझी सखी...