आजी ते माजी प्रवास😊

आजी ते माजी प्रवास 😊
 आठवतो का तो दिवस आई च्या नावाने आकांताने रडणारे आपण... ती छोटी पाण्यची बॉटल, ते शाळेच्या ड्रेस वर लहान असं रुमाल आणि आई तू बाहेर बस अस सांगणारे आपण...आई ५ मिनिट बाहेर बसायची अन् आपल्याला शाळेत बसवून कधी हुल देऊन निघुन जायची कळत देखील नव्हतं 😂... तेव्हा आपल्याला शांत करणारी दुसरी आई अर्थात आपली शिक्षिका❤️ आई तिच्याच भरोसे आपल्याला सोडून जायची....त्या दिवसापासून आपल शाळेशी तेथील शिक्षकांशी नात जोडलं गेलं...काय बरोबर ना??? 
(बरं एक विचारू???
मी शाळेत जाताना रडलेली की नाही  हे मला नाही आठवत तुम्हाला आठवत का ??? 

आठवत असेल तर नक्की कमेंट करून सांगा...😬🤭 )

बालवाडी पासून ते सातवी पर्यंत आपण शिक्षकांच्या सावलीखाली होतो. कुठली जबाबदारी नव्हती करियर नावाचा तो प्रेशर नव्हता. जीवन कसं एकदम सुंदर चालू होतं. मित्रमैत्रिणींशी एक घट्ट नातं झालं शिक्षक पूर्णतः आई-वडील वाटू लागले. किंबहूना शिक्षकांमध्ये देखील एक मैत्रीच नात निर्माण झालं अस म्हणायला हरकत नाही.
मग काय आठवी ते दहावीचा प्रवास हा जरा जडतर वाटायला लागतो. खरी सुरवात होते अभ्यासाला हे तीन वर्ष अशी असतात ना जिथं विद्यार्थी घडतो.जिथं शिक्षक आपल्या कलागुणांना वाव देतात,पुढं जाण्यासाठी प्रोत्साहित करतात मग तो first bencher असो अथवा back bencher. कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देतो त्यापासून सुंदर मडके घडवतो. शिल्पकार ज्या पद्धतीने ओबड धोबड दगडापासून सुंदर शिल्प घडवतो, त्याचप्रमाणे शिक्षकदेखील मुलांना घडवत असतात. मग येतो दहावीचा अखेरचा दिवस "send off". हा शाळेतील शेवटचा दिवस,शेवटचा पडाव.हे प्रत्येक विद्यार्थ्याला आणि शिक्षकांना माहिती असत तरी पण शिक्षक आणि विद्यार्थी आनंदाने हा दिवस साजरा करतात, खरचं आनंद असतो??? 
शिक्षक आणि विद्यार्थी खूप मज्जा-मस्ती करतात पण त्या मज्जा-मस्तीच्या मागे एक विरह दडलेला असतो. बरेच विद्यार्थी संभाषण,कविता चांगले चांगले अनुभव सांगतात,शिक्षक टाळ्या वाजवतात पण कुठेतरी हृदय, मन भरून आलेलं असतं.
 विद्यार्थी शिक्षक शाळा दहा वर्षाचं नात.....♥️♥️
हे एक लहानस संभाषण मी एका विद्यार्थिनीला, तिच्या शाळेत तिचं मनोगत व्यक्त करण्यासाठी लिहून दिलं....पण हे माझं देखील मनोगत आहे जेव्हा मी शाळेत होते तेव्हा हे असं लिहिन वैगरे काही जमत नव्हत पण आज एक संधी मिळाली... अन् सुचलं...
निरोप देणं आणि निरोप घेणं या नाण्याच्या दोन बाजू....
बाळा असा असा निरोप शेजारच्या काकूंना देऊन ये हे झालं निरोप देणं, मुलगी आई-वडिलांना सोडून सासरी निघून जाते हे झालं निरोप घेणं
असाच एक क्षण आम्हा दहावीच्या मुलांच्या आयुष्यात आलाय. तर नमस्कार मी....... आज इथे सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावर विराजमान शाळेच्या मुख्याध्यापिका सौ ......,शिक्षक वृंद आणि माझ्या विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो आज ह्या निरोप समारंभ दिनी मला माझं मनोगत व्यक्त करण्याची परवानगी द्यावी...
बघा ना आज मी ह्या शाळेची विद्यार्थिनी म्हणून माझे मनोगत व्यक्त करत आहे अन् उद्या या शाळेतील माजी विद्यार्थिनी होणारं...
नवल आहे ना क्षणातच बद्दल !!!
आपल्या शाळेचा शेवटचा दिवस आहे सॉरी सॉरी शाळेचा नाही आम्हाला दहावीच्या मुलांचा शेवटचा दिवस आहे... बरोबर ना?
आज दहावीत आहे उद्या कॉलेज ला जाणार आयुष्य बदलणार आम्हा 10 वी च्या मुलाचं....
ह्या बदल्यानाऱ्या आयुष्यावर आणि आताच्या आयुष्यावर एक कविता सादर करीत आहे 
शाळेमध्ये जाणं वर्गात बसन शिक्षकांचा ऐकन
एक वेगळीच मज्जा होती 
ती मज्जा
आता एक आठवण बनून राहणार....
कॉलेजमध्ये जाणं तिथलं होणं वेळ लागतं 
शाळेत जाणं तिथलं होण क्षण लागतं
तो क्षण 
एक आठवण बनुन राहणार...
कॉलेजमध्ये आपण स्पर्धा करतो पुढे जाण्यासाठी
शाळेमध्ये मज्जा करतो एकत्र राहण्यासाठी
तो एकत्र पणा
एक आठवण बनून राहणार... 
तिथं काय कॅम्पस असणार तिथे जाणार खाणार पिणार 
शाळेमध्ये मधली सुट्टी म्हणजे वडापावच्या गाडीवर दंगा करणार
ती दंगा
एक आठवण बनुन राहणार...
शाळेमध्ये शिक्षक पाठीवरती थाप देतात 
ती कौतुकाची असो अथवा रागाची
कॉलेजमध्ये शिक्षक दोन शब्द बोलणार आणि निघून जाणार
ती थाप 
एक आठवण बनून राहणार....
शाळेमध्ये विद्यार्थी घडतो तिथे आजी ते माजी प्रवास होतो 
हा प्रवास 
एक आठवण बनून राहणार...
किती अस्मरणीय आहे हा प्रवास माझ्या अंगी जसा माझ्या आईवडिलांनी वळण लावल तसच माझ्या शिक्षकांनी देखील वळण लावलं कधी ज्ञानाचा अनुभवाचा तर कधी संस्कृतीचा लेप लावला. आम्हा दहावीच्या मुलांच्या आयुष्यातील अविभाज्य भाग म्हणजे आमची शाळा ईथले शिक्षक सगळे मित्र मंडळ हे सगळ पुन्हा होणे नाही.खरच हे सगळे क्षण अवीस्मरणीय आहेत....माझ्या अंगी तुम्ही सर्वांनी जे वळण लावल त्यात मी खरी उतरेन न माझ्या शाळेचं नाव उंचावर घेऊन जाईन ....धन्यवाद....
हे सगळ मला माझी दहावी झाली तेव्हा बोलायचं होत पण असो.....😕
आज मात्र मी हा लेख माझ्या शाळेतल्या शिक्षकांना आणि माझ्या शाळेला देऊ इच्छिते.....
आज मी बऱ्याच दिवसांनी शाळेत गेलेले तेव्हा माझ्या शिक्षकांनी माझी ओळख ही आपल्या शाळेची माजी विद्यार्थिनी म्हणून ओळख करून दिली....
तेव्हा समजल आपला आजी ते माजी प्रवास झाला🤭😀❣️
-रविना थोरवे.
                   माझ्या शाळेचं छायाचित्र
          श्री.आर के अभंग माध्यमिक विद्यालय.

Comments

Popular posts from this blog

खेळांच्या शोधात...

माझी सखी...