मैत्रीण…

 

मैत्रीण…👫     

आजची सुरवात दोन ओळीच्या कवितेपासून...

“मैत्री ही स्त्री किंवा पुरुष या वर अवलंबून नसते

मैत्री हे अस नात आहे

जे भेदभावपेक्ष्या निष्ठावंत व्यक्ती सोबत केलेली असते

प्रत्येक पुरूषाच्या आयुष्यात एकतरी मैत्रीण असतेच मग ति आई,बहीण कुणीही असू शकते.                                             

माझी पण एक मैत्रीण आहे ति ना माझी बहीण,ना आई,ना माझ्या कालेज मधली न माझ्या अॉफिस मधली परंतु जवळची मैत्रीण आहे.अगदी लहानपणापासून तारूण्यात पदार्पण करण्याच्या वया पासून माझ्यावर मनापासून प्रेम करणारी परंतु नात्याने फक्त माझी मैत्रीण असणारी, माझ्या खदखदून हसण्यामागील काळजी व माझ्या स्मिथ हास्या मागील दु;ख ळखणारी माझी मैत्रिण चार चौघांमध्ये मुद्दाम माझ्या बाजूला येऊन खांद्यावर हात ठेवून बसणारी,फिरायला जातांना आवर्जून माझ्याच गाडीवर बसणारी,फोटो काढताना मुध्दाम जवळ येऊन हात पकडनारी,एखाद्या मुली बद्दल माहीती विचारली असता मुद्दाम काहीतरी बोलून "ति तूझ्या लायकनाही आपण दूसरी कोणती बघू"असे बोलणारी माझी मैत्रीण.                                                

जर कधी आजारी पडलो तर "दवाखान्यात जा,औषध खा,बाहेर जाऊ नकोस"असे ठणकाऊंन सांगणारी माझी मैत्रीण पैशाची अडचण पडली असत,तिला मागितले व जर पर्स मध्ये पैसे नसेल तर अंगावरचा दागिना काढून देण्याची तयारी ठेवणारी माझी विश्वासू मैत्रीण.                                  

तिझ्या सोबत काढलेला फोटो सोशल मिडीया वर टाकलेला बघून चार चौघांना तरी नक्कीच वाईट वाटेल ,तसेच चार चौघात आम्ही बोलत असताना अनेकांच्या  नजरेचा नेम आमच्या वरच आहे हे लक्षात आले असता मुद्दाम अजून मोठ्याने बोलणे व अजून जास्त मोठ्याने हसणारी अशी खोडकर,वेळप्रसंगी माझ्यासाठी एखाद्यला शिवी देणारी तसेच एखाद्यची कॉलर पकडणारी,कोणालाही न घाबरणारी माझी मैत्रीण.तिझ्या आयूष्यमध्ये कितीही वाईट प्रसंग आला असता प्रथम माझ्याकडे येणारी व मनातल सर्वकाही बेचीचक  सांगनारी माझी मैत्रीण.   

माझ्यासाठी जगाच्या विरूद्ध जाणारी तिझ्या आयूष्यातील त्या महत्त्वाचा व्याक्तींना माझ्या नंतरच स्थान देणारी.खूप आनंदी असतांना अगदी I LOVE U RE अस सहज म्हणणारी किंवा चक्क FLYING KISS  देणारी, साखरेलेही मागे टाकणारी खुप गोड आहे ति माझी मैत्रीण.

एका चित्रपटात म्हटल आहे या मैत्री च्या नात्या बद्दल ते अस कि "तिच आणि माझ नात मैत्रीच्या थोडस पलीकडे व प्रेमाच्या थोडस अलीकडे ,या नात्याकडे बगण्याचा जगाचा दूष्टीको वेगळा असेल परंतु आमच नात मात्र शुद्ध आहे.

सुरवात कवितेपासून तर शेवटही तसच...

“सुंदर ही आमची मैत्री

जन्मोजन्मी टिकेल

अशी आहे मला खात्री

रक्ताने जरी वेगळे

तरी नात्याने एक

माझी मैत्रीण ही माझ्यासाठी

लाखात एक

-रविना थोरवे

 

 


Comments

Popular posts from this blog

खेळांच्या शोधात...

आजी ते माजी प्रवास😊

माझी सखी...