चहापाव...

चहापाव...

गडबडला असाल ना हा शीर्षक वाचून, चहापाव हा शीर्षक का अस वाटल असेन ना...पण काय करणार मला हेच सुचलं...😀

चला तर चहापाव हा शीर्षक का हे जाणून घेऊ...

दोन जिवाभावचे मित्र एकाच महाविद्यालयात शिकत... एकाच नाव रमेश तर दुसऱ्याच नाव रोहित.दोघांची मैत्री घट्ट होती पण स्वप्न मात्र वेगवेगळी.

रमेश श्रीमंत तर रोहित गरीब. असतात अशी बरेच मित्र मैत्रिणी जी माणुसकीने जोडली जातात त्यातलेच हे दोघे. रोहित गरीब होता तो नोकरी करून शिक्षण घेत असे. अन् रमेश श्रीमंतीने वाढलेला असला तरीही घरच्यांचा विरोध पत्करून तो स्वतच्या स्वप्ननानं कलाटणी देण्यासाठी बाहेर पडलेला. त्यामुळे रमेश कडे खर्च करण्यासाठी पैसे खूप कमी होते कारण घरून पैसे येण बंद झालेल.एके दिवशी त्यांच्या एका मित्राचा वाढदिवस असतो अशहयातच कॉलेज च जीवन बोलल तर हे सगळ येणारच. रमेशकडे पैसे कमी असल्याने त्याने थोडेफार होते तेवढे पैसे दिले आता पैसे वाचवण्यसाठी त्या रमेश ने एक वेळच जेवण बंद करून त्याएवजी चहापाव खायला सुरुवात केली होती.हा सर्व प्रकार रोहित ला समजून आला. हया वरुन त्याच्यात वाद ही झाले परंतु मैत्री अशी की वाद ला ही निमुळतेपण घ्याव लागल.

(रोहित त्याला खूप छान समजावून सांगतो)

रोहित: अरे आयुष्यात कितीही संकट आले ना तरी ते समोर जाण्याची ताकद आपल्याला आयुष्यच देत असत.

रमेश: अरे कसं आहे ना मित्रा, मी जरी आई वडिलांच घर सोडल तरी त्यांनी दिलेल संस्कार नाही सोडले.

रोहित: मान्य आहे रे सगळ मला पण मित्र म्हणून एकदा हक्काने सांगयच ना. खास मित्र म्हणवतोस ना म एकदा हया खास मित्राची आठवण नाही का रे आली???

रमेश: तुला संगितल असत रे, पण हा चहापाव खाल्ल नसत तर मला माझ्या स्वप्ननांची किंमत ही कधी कळलीनसती.

अन् माझ्या स्वप्ननांना कलाटणी देण्यासाठी हया चहापाव चा थोडासा हातभार असच समजेन मी...

अर्थात स्वप्न देखील चहापाव सारखीच असतात चहाला पूर्णत्व देणार पाव तर स्वप्ननांना पूर्णत्व देणार कष्ट...

प्रत्येक मनुष्य हा आपल्या कष्ट करणायच्या काळात एकदातरी चहापाव खतोच...ही सत्यता कुणीच बदलू शकत नाही.

-रविना थोरवे.


Comments

Popular posts from this blog

खेळांच्या शोधात...

आजी ते माजी प्रवास😊

माझी सखी...