प्रिय मास्क...

प्रिय मास्क...😷😷

तुला कधी कुणी प्रिय नसेल म्हंटल ना... कारण तशी कधी वेळच नाही आली, माफ कर पण तुला प्रिय अस कधी म्हणावस वाटलच नाही. तुझ अस्तित्व खूप आधीपासून आहे पण ते असून नसल्यासारख होत. माहीतये का???

कारण तुझी गरज ही फक्त इस्पितळात डॉक्टर पूर्तीच तीही जास्तीत जास्त ऑपरेशन थिएटर पर्यंतच.आणखी ही बऱ्याच ठिकाणी तुझ्या वापर होत असे. पण आता मात्र तुझी खरच इस्पितळात नव्हे तर लहान ते मोठ्यानपर्यंत सगळे वापर करतात.प्रत्येक क्षेत्रात तू सर्वाना हवाहवासा झालय. तुझ्याशिवाय सर्वांची काम अडतात,तुला घेतल्याशिवाय कुणी घराबाहेर पडतच नाही.

तुलाही माहीत आहे तुझा मान,तुझी किंमत,तुझी गरज का वाढली. हा कोरोना नसतं आला तर आजही तुझी गरज ही इस्पितळात पूर्तीच राहिली असती. सध्यातरी तू आमच्या आयुष्यातील अविभाज्य भाग आहेस. कुणाच ठाऊक पुढे कशी परिस्थिती असेल. परंतु आता तुला सोबत घेऊन गेलो नाही ना तर लोकांच आपल्याकडे बघणण्याच दृष्टिकोणच बदलतो.

आता कोरोना काळात तोंडावर पावडर नाही लावली तरी चालेल पण तुला घेतल्याशिवाय बाहेर पडताच येई ना,कारण तूच आमचा प्रिय मास्क”

“जिथे कधी तोंडाला स्कार्फ/रुमाल बांधायला कंटाळा करायचो तिथे सतत तुझी आठवण येते,कारण तूच आमचा प्रिय मास्क”

वाटल नव्हत परिस्थिति अशी बदलणार

अन् तू सर्वांच एवढा आवडता होणार”

तुला प्रिय म्हणण्यामगच कारण अस की, तू आमची खूप काळजी घेतोस, आम्हाला सुरक्षित ठेवतोस. अन् तुलाही माहीत आहे आपली जो काळजी घेतो तो आपला प्रिय असतो... 

म्हणून तू आमचा प्रिय मास्क

तुझे खूप खूप आभार

-रविना थोरवे 


Comments

Popular posts from this blog

खेळांच्या शोधात...

आजी ते माजी प्रवास😊

माझी सखी...