प्रिय लाॕकडाउन

प्रिय लाकडाउन🔐

लाकडाउन टाळे लावणे,तू तर पूर्ण जगालाच टाळे लावलेत...        

सुरुवातीला  तू खरच प्रिय वाटला आम्हा सर्वाना पण आता तुला प्रिय म्हणायला खरच अघवडल्यासारख होत पण तू आला नसतास तर आज खूप लोकांनी आपल जीव गमावला असत,जीव तर आताही गमावतात पण तुझ्यामुळे थोड कमी...  

तस तू  दिनांक २२  मार्च २०२० तूझ्या येण्याची सूचना दिलीस परंतु ती आम्हाला कळलीच नाही.अचानक २५ मार्च ते १४ एप्रिल अशी तूझी वेळ ठरविण्यात आली व सगळकाही ठप्प झाल.दिवस-रात्र कुटुंबासाठी धडपड करणारा कुटुंबापासून लांब असणारा तो आज कुटुंबामध्ये मिसळू लागला सकाळच्या चहा पासून ते रात्री च्या जेवणापर्यंतचा आनंद तो घेऊ लागला. सकाळी जायची घाई तर रात्री थकून येणारा तो कुटुंबाचा आसवाद घ्याला त्याच्याकडे वेळच नसतो, पण लाकडाउन तुझ्यामुळे हे शक्य झाले.

तुझ्यामुळे मी कुटुंबाला वेळ दिल म्हणून तुझ्यासाठी  दोन ओळी

“तुझ्यामुळे दिवस रात्र सगळ बंद असत

माझ मन मात्र माझ्या कुटुंबात रमत

असो...कविता झाली आता सत्यात उतरू..

काही माणसांसाठी सिनेमा हा ,मोठ मोठे मा, हॉटेल यांनसारखे करमणूक तसेच चैनिचे विषय पूर्णपणे बंद झाले परंतु यामुळेयुष्य जगण्यासाठी नेमक काय महत्वाच असत हे माणसाच्या लक्षात आले व बेभान होऊन जगणारा माणूस भाणावर आला.

तू निसार्गवर देखील खूप माया केली आहेस.वर्षानुवर्षे आम्ही मानवाने निसर्गाकडे पाठ फिरवल्यामुळे निसर्गाची झालेली नासाडी मानवाला कधीच सूधारता आली नसती ती तू सुधारवलीस त्याबद्दल मी तूझा खूप खूप आभारी आहे...                                  

प्रिय लाकडाउन तू केव्हा जाशील हे मला माहीत नाही कदाचित तूलाही माहीत नसेल कारण तुझा तो मित्र करोना तो अस हया जगाला चिटकून आहे ना की त्याच्यामुळे तुझाही वेळ वाढत चाललंय परंतु तूझ्या यैण्याने माणवाचे आयूष बदलले सूरवातीच्या काळात तू आवडला हळू हळू तूझा कंटाळा आला आता मात्र तूझी सवय झाली  म्हणून तूझी चिड येत आहे. मला माहीत आहे तूझ येण व्यर्थ नाही तूझ्या येण्यामागे खूप मोठ कारण आहे परंतु माझी एक विनंती आहे जाता जाता तूझ्या येण्याचे हे कारण नेहमी साठी तूझ्या सोबत घेऊन जा...

माफ कर पण पुनः कधी येऊ नकोस

-रविना थोरवे


Comments

Popular posts from this blog

खेळांच्या शोधात...

आजी ते माजी प्रवास😊

माझी सखी...