पिढीतंर

पिढीतंर
अंतर हा फक्त एका वस्तूत,गोष्टीत,चार माणसांमध्ये नसतो. आपण सहज बोलून जातो, चार ठिकाणी वाचतो "सुरक्षित अंतर ठेवणे".ह्या अंतराचे बरेच अर्थ असतात. त्यापैकी एक महत्त्वाचा अंतर म्हणजे दोन पिढ्यांमधील अंतर..
पिढी अंतर (generation gap) म्हणजे तरी नेमक काय???
दोन पिढ्यांमधील अंतर एक पिढी जर आज जन्माला आली असेल तर दूसरी कमीत कमी १० वर्षाने जन्माला येने ह्यालाच पिढी अंतर (generation gap)असे म्हटले जाते. अनेक वेळा आपण एका लहान अन् मोठ्या व्यक्तींमधील वाद किंवा असमंजसपणाला पिढी अंतराचे(generation gap) कारण देतो,पण हे कारण बरोबर आहे का?
चला तर मग आपण या विषयावर  पूढे काही अभ्यास करु...                 
एका कुटुंबामध्ये  सर्व सदस्य ऐकाच पिढी (generation)चे असातात का??? आई-वडील व मूले याच्या मध्ये कमीत-कमी २० ते २५ वर्षांचा फरक असतोच मग सुसंस्कृत व लहान परंतु समंजस मुलांचे त्यांच्याशी जमत नाही का???
जमत जमवून घ्याव...
कारण त्या ठिकाणी आई-वडील मोठे आहेत ते आपल्या हिताची काळजी करतील असे मूल मान्य करतात तसेच मुले अजून लहान आहेत अस आई-वडील समजून चालतात त्यामुळेच त्यांच्यातील हे अंतर नाहीसे होते...
शाळा,काॕलेज मध्ये शिकतांना किंवा एखाद्या कार्यालयात कामाच्या  ठिकाणी  आपण आपल्या वरिष्ठांशी बोलता तसेच काम करताना त्याना ते आपल्यापेक्षा जास्त समजदार व अनुभवी आहेत असे समजतो.                  
मग हा पिढी अंतर (generation gap)आपल्याला कूठे आडवा येतो???
आयुष्याचा जोडीदार शोधण्यासाठी  आपण पिढी अंतर (generation gap ) हा एक मोठा विषय समोर ठेवतो. पण का???
जर या ठिकाणी लहानाने मोठ्यानं चे अनुभव  व मोठ्याने लहानाचे नवीन कौशल्य आपले व आपल्या जोडीदार चे आयूष्य घडवण्या साठी वापरले तर आयूष्य नक्कीच सुंदर नाही का होणार?                                                  आता सांगा कुठे गेला तूमचा(generation gap)पिढी अंतर???
 वाचल्यानंतर नक्कीच उत्तर द्या किंवा तुमच्या प्रतिक्रिया द्या.
-रविना थोरवे.

Comments

Popular posts from this blog

खेळांच्या शोधात...

आजी ते माजी प्रवास😊

माझी सखी...