इंटरनेटची कमाल..

इंटरनेटची कमाल... 
इंटरनेट.. आजच्या जगात तू किती जवळचा आहेस याची कल्पना देखील तू नाही करू शकणार.......खरंच
खाता पिता उठता बसता प्रवासात सतत सगळीकडे तू सोबत असतोस. तुझ्यासोबत तुझा तो खास मित्र मोबाइल अन् तो कम्प्युटर... 
असो...
आजची पब्लिक फुल्ल प्रेमात आहे राव तुझ्या,सतत तुझा वापर असतो...
तुझा जन्म झाला तेव्हा लोकांकडे तो साधा मोबाइल  असावा. तिथून तुझी हळूहळू क्रेझ वाढली ती अजून तशीच आहे अन् पुढेही अशीच राहील,आता तर स्मार्ट मोबाइल आलेत म्हणून आता तुझ्याविणा करमेना अस झालय.
तुझ्यामुळे आम्ही पूर्ण जगाची माहिती अशी सहज आमच्यापाशी ठेवतो.तुझ्यामुळे लोकांची काम खूप सोप्पी झाली आहेत.
सध्या ह्या कोरोना च्या काळात तू खूप मोठा हातभार लावला आहे अस मला वाटत कारण तुझ्यामुळे आम्ही आमच्या कुटुंबाशी आमच्या नातेवाईकांशी कनेक्टेड राहिलो...ह्या लॉकडाऊन मध्ये सर्व कामे ही “वर्क फ्रॉम होम” देण्यात आली.त्या सर्वाना तुझी खूप मदत झाली. 
तुझ्यामुळे आम्हाला घर बसल्या सर्व काही मिळून जात रे... खरंच कमाल आहेस रे तू...
तू नसला तर काय होईल रे आमच.
बापरे... नको नको अस विचार ही नको...
ह्या सगळ्यासाठी मी तुझा वापर करणारी एक हा...तुझे मनापासून आभार मानते... 
धन्यवाद... खरंच मनापासून आभारी आहे...
-रविना थोरवे.

Comments

Popular posts from this blog

खेळांच्या शोधात...

आजी ते माजी प्रवास😊

माझी सखी...