वाढदिवस...🎂

ज्या दिवशी आपली आई कळा सोसून रडत रडत हसत असते तो दिवस म्हणजे 
वाढदिवस...
वाढदिवस म्हणजे एखाद्या जिवाची,वस्तूची किंवा कार्याची सूरूवात केलेला दिवस.
प्रत्येकाच्या जीवनात एकदा तरी हा दिवस येतोच, येतोच काय  देवाने हा दिवस सर्वांच्या आयुष्यात दिलेला असतो. मनुष्यजात  हा दिवस करते.काहींच्या जीवनात प्रत्येक वर्षी हा दिवस मोठ्या थाटाने साजरा होतो तर काहींच्या नाही असो ज्यांच्या जीवनात हा दिवस साजरा होतो ते त्यांच नशिब. 
जग बदलते तस चालीरीती ही बदलतात.अलीकडच्या काळात  सामाजिक माध्यमा व्दारे (SOCIAL MEDIA )नवनवीन यूक्तीचा वापर करून खूप सुंदर पध्दतीने शुभेच्छा दिल्या जातात थोडाफार अश्या प्रकारेही आपण आपला आपण वाढदिवस साजरा करतो.
हिंदू संस्कृती नूसार एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस असेल तर त्या व्यक्तीची आरती ओवाळली जाते,त्याला कुंकवाचा टिळा लावून  घरचे मोठे त्याला आशीर्वाद देतात त्या व्यक्तीला पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या जातात व तोंड गोड करण्यासाठी एखादा गोड पदार्थ त्याला खाण्यासाठी दिला जातो आजच्या  काळात वाढदिवस व्याख्या पूर्णतः बदललेली आहे, वाढदिवस म्हटल की मित्रांनी किंवा नातेवाईक यांनी आणलेले केक त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे नक्षीकाम व त्या व्यक्तीचे वेगवेगळ्या प्रकारात काढलेले नाव काही जण  तर नावच्याच  शब्दांच केक आणतात.तसेच सोबत फूलबाजा (SHOWER) असतो वाढदिवस असलेल्या व्यक्तीने तो केक कापावा व सर्वाना भरवावा तसेच सर्वानी त्यालाही भरवावा एवढेच नव्हे भरवताना त्याच्या चेहऱ्याला लावणे व काही ठिकाणी मुलांचे  कपडे देखील फाडले जातात बस हा प्रकार मूलींनसोबत होत नाही एवढंच बाकी केक वेेगरे कापला जातो.नंतर हा केक चा  कार्यक्रम आटोक्यात आणला जातो व मग पुढचा कार्यक्रम कोणत्यातरी हाॕटेल किंवा धाब्यावरती असतो रात्र तिथेच जाते. आपला दिवस हा इतर दिवसांप्रमाणे उगवतो अन् मावळतो पण हा दिवस जरा खास असतो कारण ह्या दिवशी शुभेच्छा भेटववस्तू ह्याचं वर्षाव असतो तर कुणी मिठी मारून शुभेच्छा देतं...असो...
तर वाढदिवस कसा असावा???
वाढदिवस हा आंनद देण्यासाठी साजरा करतात.. बरोबर ना...
म ज्या व्यक्तीचा वाढदिवस असतो त्याला सकाळ पासून रात्री निजेपर्यंत आनंद देण्याचा प्रयत्न करतो.तूम्हाला जर खरंच असे वाटत असेल की त्याला काहीतरी द्यावे तर भेटवस्तू देण्याऐवजी त्याला सकाळी चहा नाशत्या साठी तूमच्या घरी बोलवा त्याच्या आवडीचा छान छान  नाश्ता बनवा किंवा दूपारी अथवा रात्री छान जेवणाचा बेत आखा त्याला जेवणासाठी निमंत्रण दया. बघा त्याला किती आनंद होते ते...
तूम्ही दिलेल्या हजारो रूपयांच्या भेटवस्तू मध्ये देखील त्याला भेटणार नाही एवढा आनंद त्याला तुमच्या या सर्व गोष्टीने मिळेल कारण दिलेल्या वस्तु कधी न कधी फेकून देतात पण दिलेले आनंदाचे क्षण कधीच विसरता नाही येत. लक्षात ठेवा दीलेल्या मान पानाची किंमत ही दिलेल्या मौल्यवान  भेटवस्तूं पेक्षा अमूल्य असते.
-रविना थोरवे.

Comments

Popular posts from this blog

खेळांच्या शोधात...

आजी ते माजी प्रवास😊

माझी सखी...