शिक्षणाचा बाजार...

शिक्षणाचा बाजार...
शिक्षण म्हणजे तरी नेमक काय???
शिकून शहाणे होणे म्हणजे शिक्षण???
पण आपण नक्की शहाणे झालो का???
हा प्रश्न स्वत:चा स्वत:ला विचारून पहा, बघा काय उत्तर मिळत ते...
शिक्षणचा बाजार हा शीर्षक देण्यामागाच कारण अस की, जस आपण आता आपल्या रूढी, परंपरा विसरत चाललोय तस आपण आपल्या शिक्षणाच्या जुन्या पद्धती विसरत चाललोय. सध्या आताच्या काळात सर्व ऑनलाइन शिक्षणावर जास्त भर दिला जातो.अनेक प्रसार माध्यमांद्वारे शिक्षण दिल जाते. म्हणून विध्यार्थी घर बसल्या शिक्षण घेतात.पण त्या विध्यार्थीचं काय ज्याच्यापर्यंत मोबाइल, इंटरनेट जाऊ शकत नाही.त्या खेडयातील विध्यार्थीचं काय ज्याची मोबाइल,इंटरनेट विकत घेण्यासाठी पण हवे तितके पैसे नसतील. 
अश्या विध्यार्थीसाठी सोई-सुविधा पुरवतात का???
चला एखाद्यावेळी त्या सोई-सुविधा पुरवल्या जातातही पण त्या नेमक्या त्याच्यापर्यंत पोहचतात का???
ह्या सगळ्यामध्ये भीषण बाब अशी की अनेक लोक शिक्षणाचा धंदा करतात,शिक्षण हे विकलं गेलय डोनेशन च्या नावाखाली,त्यामुळे कित्येक हुशार आणि गरीब विध्यार्थीचा जीव घोटला जातो.मी वर खेड्यातील विध्यार्थीचं उल्लेख केला कारण अनेक शेतकरी स्वत:च्या मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज घेतात पण तो कर्ज घेतलेला पैसा शिक्षणासाठी नव्हे तर डोनेशन साठी असतो.कधीकधी हा शिक्षणाचा बाजार देखील शेतकऱ्याच्या आत्महतेचा कारण असतो... असतोच.
जर आपल्या सारखा सामान्य माणूस एकत्र आला तर हा शिक्षणाचा बाजार थांबवू शकतो का???
बघा, वाचा आणि विचार करा की सुरवात आपल्या पासून केली तर आपण हा शिक्षणचा बाजार थांबवू शकतो.
- रविना थोरवे.

Comments

Popular posts from this blog

खेळांच्या शोधात...

आजी ते माजी प्रवास😊

माझी सखी...