आजी ते माजी प्रवास😊

आजी ते माजी प्रवास 😊 आठवतो का तो दिवस आई च्या नावाने आकांताने रडणारे आपण... ती छोटी पाण्यची बॉटल, ते शाळेच्या ड्रेस वर लहान असं रुमाल आणि आई तू बाहेर बस अस सांगणारे आपण...आई ५ मिनिट बाहेर बसायची अन् आपल्याला शाळेत बसवून कधी हुल देऊन निघुन जायची कळत देखील नव्हतं 😂... तेव्हा आपल्याला शांत करणारी दुसरी आई अर्थात आपली शिक्षिका❤️ आई तिच्याच भरोसे आपल्याला सोडून जायची....त्या दिवसापासून आपल शाळेशी तेथील शिक्षकांशी नात जोडलं गेलं...काय बरोबर ना??? (बरं एक विचारू??? मी शाळेत जाताना रडलेली की नाही हे मला नाही आठवत तुम्हाला आठवत का ??? आठवत असेल तर नक्की कमेंट करून सांगा...😬🤭 ) बालवाडी पासून ते सातवी पर्यंत आपण शिक्षकांच्या सावलीखाली होतो. कुठली जबाबदारी नव्हती करियर नावाचा तो प्रेशर नव्हता. जीवन कसं एकदम सुंदर चालू होतं. मित्रमैत्रिणींशी एक घट्ट नातं झालं शिक्षक पूर्णतः आई-वडील वाटू लागले. किंबहूना शिक्षकांमध्ये देखील एक मैत्रीच नात निर्माण झालं अस म्हणायला हरकत नाही. मग काय आठवी ते दहावीचा प्रवास हा जरा जडतर वाटायला लागतो. खरी सुरवात होते अभ्यासाला हे तीन वर्ष अशी अ...